शहाणे हे जणं जाणती अंतर

शहाणे हे जन जाणती अंतर । 
लपावया घर नाही कोणा ।।
फोडोनिया गार हिरा दाखविती ।
ऐसी आहे रीति जाणत्यांची ॥
सज्जनाचा भाव लपेना सायासे । 
कधी अनायासे दिसे जगा ।
तुकड्यादास म्हणे मूर्खाची किंमत । 
प्रसंगे समस्त कळो येई ।