सोनियास नाही रंग द्यावा लागे

सोनियासी नाही रंग द्यावा लागे । 
आपूलिया रंगे सोने दिसे ।।
साधु घालो माळ राहो दिंगंबर । 
तयाचे अंतर दिसे जना ॥
वाजे बहु कासे कनका न नाद । 
तैसा सहज बोध साधुसंगे ।।
तुकडयादास म्हणें नगले सांगणे । 
अधिकारवाणे दिसे जना ।।