साधुसंत हे तो स्वये होती अंगे

साधुसंत हे तो स्वये होती अंगे। 
दावावे न लागे जन लोकां ॥
पिकलिया फळा जन जाणताती । 
तैसी आहे रीति साधु-खूण ।।
जना दाखवाया होऊ गेला संत । 
होईल फजीत एकेकाळी ॥
तुकडयादास म्हणे व्हावे लागे स्वये । 
तरीच निर्भय निभे काळ ।