संतपण काय मिळते तराजू
संतपण काय मिळते तराजू ।
बाजारी सहजू दुकानांत ? ॥
उठे सुटे म्हणे साथु मी होईन ।
काय ती लहान गोष्ट आहे ? ।॥
शीर हाती घ्यावे मरणी हासावे ।
तेव्हा कोठे पावे संतपद |।
तुकड्यादास म्हणे ऐकरे शहाण्या !।
बेगडीच्या नाण्या ज्ञानी जाणे ॥