एक भोंदू राहे

एक भोंदू राहे भोगणे थे सर्वा  । 
सज्जनांच्या नांवा डाग लागे ॥
दहा फळांमाजी एकचि सडके । 
दहाचिये फिके वाण करी ॥
स्वार्थीच हे जन कळेना कोणासी । 
उणखूण कैसी साधुसंती ॥
तुकड्यादास म्हणे सांगितले जरी । 
लोभाचिये सरी गुण नाही ॥