स्वार्थी लोक नेणती विचार
स्वार्थी लोक कांही नेणती विचार ।
आपुला व्यवहार साधावयां ।
नाड़ताति तेणे पावोनिया दुःख ।
जनी हे कौतुक पहाती लोक ॥
अ-साधुसी साधु करुनी ठेविती ।
मागुतां पावती पक्षाताप ।।
तुकड्यादास म्हणे करावा विचार ।
तरिंच पैलपार पावे प्राणी ॥