चला चला सकळ जणं

चला चला सकळ जनर !। 
करू संतांचे दर्शन ॥
तिथे घेऊ उपदेश । 
चाखावया ब्रह्मरस ।
हरू जन्म- व्याधी । 
तोडू यमाची उपाधी ॥
तुकड्यादास म्हणे यारे । 
संता-पायी व्हा सामोरे ॥