चला करा रे तातडी

चला करा रे तातडी । 
भरा भरा ह्या कावडी ॥
हृदय-कोठा धुवा आधी ।
भरा तयाचिया मधी ॥
बंद ठेवा चहुंकडे । 
लावा दारासी कवाडे ॥
तुकड्या म्हणे संतसेवा । 
हेचि धनामाजी ठेवा ॥