सेवा करणे हा धर्म

सेवा करणे  हा धर्म । तेणे पावता आराम ।॥
सेवेवीण कृपा नाही । जरी फिरा दिशा दाही ॥
सेवा देवादिके केली । फळे तयांसी पावली ।॥
तुकड्या म्हणे जो विमुख । सदा भोगतसे टुःख ।।