जणी वणी सर्व राहे एकरस

जनी वनी सर्व राहे एकरस । 
चाखतो सुरस ब्रह्मानंद ॥
आवरली वृत्ति कासवाचे परी । 
धन्य त्याची थोरी जगी झाली ॥
सुख दुःखी तया एक समाधान । 
एकचि निधान ब्रह्मानंद I॥
तुकड्यादास म्हणे विरळे है जन । 
कुणा भाग्यावीण भेटी नेदी ॥