समर्था च्या घरी सेवा मनोभावे करी

समर्थाच्या घरी । सेवा मनोभावे करी ॥
तो का असेलही रंक । राजा होईल निःशंक ॥
सेवा बहुताने केली । फळे आपुली भोगिली ॥
तुकड्यादास म्हणे सेवा । मान्य देवा अधिदेवा ।।