सेवा केली हनुमंते

सेवा केली हनुमंते । द्रोणागिरी आणी हाते ।
सेवा केली सुदामाने । पावे महाल कांचने ॥
सेवा केली गजेंद्राने । देव धांवला धांवणे ॥
तुकड्यादास म्हणे सेवा । काढी बाहेर उणीवा ॥