गुरु भक्तीचीये वर्म

गुरु-भक्तिचिये वर्म । 
विरळे जाणेताती धर्म ॥
तोंडापुरती हांजी हांजी। 
ही तो भक्ति राहे गर्जी  ।।
वेळ पड़े दडे मागे । 
लाडू खाया मागे लागे ॥
तुकड्यादास म्हणे संत। 
सर्व जाणती है अंत ॥