सेवा नोहे तोंडातोंडी

सेवा नोहे तोंडोतोंडी । 
द्यावी आहुती रोकईी ।॥
सेवे ब्रह्मज्ञान पावे ।
सांगे पुराणादिक सर्वे  ॥
वरी वरी सेवा करी । 
तोचि दुःख पावे भारी ।
तुकडयादास म्हणे सेवा। 
हनुमंत ध्यानी घ्यावा !