लहानाहुन लहान व्हावे

लहानाहून लहान व्हावे । 
तेव्हां मोठेपणा पावे !॥
येरव्ही जो अहंकारी । 
कोण पुसे त्याची थोरी ? ॥
नित्य करील जो सेवा । 
तोची पावतसे मेवा ।।
तुकड्या म्हणे भोगे दुःख । 
तोचि पावत से सुख ।।