अंगी आणू नये ताठा

अंगी आणू नये ताठा । 
तेणे होतसे करंटा  ।।
सदा नम्रचि रहावे  । 
न्नह्मरस-गोडी ध्यावे ॥
मनी राहो सेवाभाव । 
सदा ठेवाना सद्भाव  ।।
तुकडया म्हणे एकत जावे । 
बोध अंतरी  पाळावे  ।।