सद्गुरुराया ! का रुसला बा, हीन दीन लेकरा?
(चाल: सदगुरुराया का..)
सद्गुरुराया ! का रुसला बा, हीन दीन लेकरा? ।
महिमा ऐकुनि आलो जवळी, होउनिया घाब ।।धृ०॥
संसाराची धार कठिण ही, शांति न देई जरा।
काम, क्रोध-लाटांच्या त्रासे, जीव होतसे चुरा।।१॥।
आशा-तृष्णा चांडाळिण ही, जीव करी हावरा।
संत-समागम मिळे न कोठे, वेळ मिळेना जरा।।२।
का बघसी मम अंत, दयाळा ? दे भक्तीचा झरा।
तुकड्यादासा तुझा भरवसा, अन्य नसे दूसरा ।।३॥