चुकलो वाटे मार्गावरुनी, संशय होइ मना।

(चाल: सदगुरुराया का..)
चुकलो वाटे मार्गावरुनी, संशय होइ मना ।
सांगा सद्‌गुरुराया! तुमच्या आलो लोटांगणा ।।धृ०।। 
वृत्ति न राही स्थीर , फिरविते सद्गुरु-वचनाविणा ।
पी मोठा या शरिरा वाटे, नग्न कधी होइना 11१॥।
काम, क्रोध हे जाळिती अंगा, स्थीर जरा राहिना ।
वरवर पुस्तक - ज्ञान आठवे, येइ महंतीपणा ।।२।।
सांग, सांग बा ! सद्गुरुराया! अपुल्या अतरखुणा ।
तुकड्यादास म्हणे करु केसे? वाटे राहतो उणा ।।३।।