साधक असावा वेड्यापरी ।

साधक असावा वेड्यापरी । जैसा दिसतो भिकारी  ॥
कोणी न बघो त्याच्याकडे । ऐसे बनावे रोकडे ॥
कधी प्रसंग न येवो । जनी बोलण्याचा लाहो ॥
तुकड्या म्हणे न दिसो त्यासी । एकाविण हृषिकेशी ॥