काय सांगू काळ गति ।

काय सांगू काळ गति । दुःख वाटे मनाप्रति ॥
जन पापाचरणी झाले । निती-नेमासी चुकले ॥
तुटली शास्त्रांची मर्यादा । कोणी स्मरेना गोविंदा ॥
तुकड्या म्हणे विरळे कोणी । राहिलेति सत्वगुणी ॥