कोणी पूजीना मंदिरा ।

कोणी पूजीना मंदिरा । घरी देव्हारी मातेरा ॥
साधु म्हणता वाटे काळ । वेश्या नावाने प्रेमळ ॥
शास्त्र  उकिरडी गेले । गृह तमाशे भरले ॥
तुकड्या म्हणे नाटककार । गमे त्यांना अवतार ॥