साधुपणाचा धंदा, नर्का नेई पूर्वजासही
साधुपणाचा धंदा, नर्का नेई पूर्वजासही
नको होउ रे, गड्या! विषय भोगाया साधू तुही ।।धृ०।।
आपण बुडतो, कुळा बुडवितो, धरुनि लोभ आसही।
कळेल मग ते, शेवटि कोणी देती ना ग्रासही।।१॥।।
चित्रगुप्तही मोजुनि पापे, ओढुनि ने यमगृही।
जन्म-जन्मि मग सूकर करवी, भोगाया रोरवी।।२॥।
नको करु रे ! धंदा, भज गोविंद सुभावे स्वयी ।
तुकड्यादास म्हणे तरि तरशिल,सत्य सत्य भाक ही।।1३॥।