सज्जनासी जागा नाही ।

सज्जनासी जागा नाही । कोठे बसाया क्षणही ॥
सर्व स्त्रैणांची भरती । प्रिय नाच्यांची संगति  ॥
सर्व साफ बाहेरून । परी कपटी जीव प्राण  ॥
तुकड्या म्हणे कोमल मुले । सर्वा व्यसनांनी गोविले ॥