सांगू काय काय झाले ।

सांगू काय काय झाले । नाही ध्यानी ते पाहिले ॥
एका वेळी नऊ पुत्र । झाले बाईला विचित्र ॥
तीन घंटीची अवधि । एकामागुनि एक येती ।॥
तुकड्या म्हणे कुमारिकेसी । मुली झाल्या कित्येकीसी ॥