ऐक रे ! सुजना मना ! वधसी कशाला जीव हे?॥|धृू? |

चाल: ठेविले पाऊल दारी..)
ऐक रे ! सुजना मना ! वधसी कशाला जीव हे ?॥धृ।। देव याने पावतो, हे कोण तुजला सांगतो?
सोड ऐशा दुष्ट भावा, घे जरा जाणीव हे।।१॥।
पाप करुनी मस्तकी, भरशी कसा कोठे तरी ? 
ना चुके करणी अशी, घे, घे जरा तरि कीव हे ।।२॥
देव भावाचा भुकेला, संती ऐसा बोध केला।
विसरुनीया सत्य बोला, धरसि का भोळीव हे ?।।3।।
जो जिवा वढतो, प्रभू त्याला वधी कोठे तरी ।
दास तुकड्या सांगतो, सद्बोध हृदयी ठेव हे ।।4।।