जगी काय कोठे चाले ।

जगी काय कोठे चाले । काय पहावे हे भले? ॥
पाहता लागे पाप माथा । अंतर पडे या रघुनाथा ॥
अपुले सांभाळोनि कर्म । जना द्यावे सत्यवर्म   ॥
तुकड्या म्हणे जनार्दन । करी जगाचे रक्षण ॥