कुबुद्धि ते करी हानि ।

कुबुद्धि ते करी हानि । दावी नर्काची निशानी ॥
तेथे कैचा प्रेमभाव । जेथे विषयांचा गौरव  ॥
द्वारी न जावे तयाच्या I ज्याची दुष्ट मन वाचा ॥
पाप लागे स्पर्श होता । जळे भक्ति भाविकता  ॥
तुकड्यादास म्हणे करा । संत संगचि हा बरा  ॥