उदार तू माय आम्ही लेकुरे तुझी

उदार तू माय आम्ही लेकुरे तुझी ।
आळ पुरवी माझी धाव घाली संकटी ॥
प्रल्हादा कारणे स्तंभ फोडोनि आली ॥
हाकेसरसी दिली मुक्ति   गजेद्रालागी ॥
संखा तुकाराम नामा गोरा कारणे ।
पुरविले उणे वेळोवेळी येवोनी ॥
चोखा अजामेळ भक्त गोजिरे तुझे ।
वारावया ओडझे नाना रूपे घेतेसी ॥
तुकड्यादास म्हणे आम्हा मायेची थोरी ।
सदा करू चोरी चरण - रज   प्यावया ॥