राग नका मानू मी तो अन्याओ राशी
राग नका मानू मी तो अन्यावो - राशी ।
आलो पायापाशी आस धरुनी देवाहो ! ॥
करा आठवण हरा भेद जीवाचा ।
नाद स्वरूपाचा नित्य द्यावा देवाहो ! ॥
काम क्रोध मद यांची सोडा सांगडी ।
करा करा गडी दास, पायी देवाहो ! ॥
भिकारी द्वारीचा भीक मागे धावोनी ।
पाजा तया पाणी ज्ञानामृत देवाहो ! ॥
तुकड्यादास म्हणे तुम्ही उदार माउली ।
भक्तांसी साउली सदा द्यावी देवाहो ! ॥