काय ओळखावे तुझ्या निशब्दी बोला ?
काय ओळखावे तुझ्या निःशब्दी बोला ? ।
ऐसा नाही दिला अधिकार या अंगी ॥
कैसा पाहू तुज अगा अरूपा देवा ! ।
नाही लेश दिवा पाहणे ते पहाया ॥
कैसी करू सेवा तू तो दृश्या परता ।
नाही माझ्या हाता बळ धराया तू ते ॥
गाऊ तरि काय अनामिया केशवा ! ।
करावया धावा हाक हाकी लागेना ।
तुकड्यादास म्हणे तू तो सर्वाचा साक्षी ।
निरिक्षोनि रक्षी, आहे आहे सांगाया ॥