आमुच्या गाविचा आम्हा दाखवा कोणी

तळमळ (मुमुक्षुता)
आमुच्या गाविचा आम्हा दाखवा कोणी ।
लागलीसे मनी काळजीचे घराची ॥
घरदार होते परि झालो भिकारी ।
जाता पर - दारी नेत्र गेले बुझोनी ॥
धरिता दुजा हात सुख वाटे जातांना ।
गेलिया यातना नाना भोगिल्या बापा ! ॥
दावा दावा कोणी नेई माझिये घरा ।
नाही तरि बरा मृत्यु - मुखी मिळालो ॥
ऐसिया आंधळ्या मार्ग देता दावोनी ।
तृप्त होई झणी चित्त माझे बापा हो ! ॥
तुकड्यादास म्हणे सद्गुरु त्या गाविचा l
ऐकिलिये, वाचा  साधु   संत - पुराणी ll