कर्म धर्म आम्हा एक तुझी सद्गुरु !

कर्म धर्म आम्हा एक तूचि सद्गुरु ! ।
तुझ्यावीण तारू नाही मद्भाव हाचि ॥
ध्यानी मनी सर्व एक गुरुचे पाय ।
तूचि बाप माय धन संपदा सारी ॥
तुझे नाम आम्हा आनंदाचा पाझरू ।
तुझ्यावीण येरू नाश होती नशिबे ॥
तूचि मोक्ष - दाता ज्ञानमान - भांडारी।
तुझ्यावीण सारी व्यर्थ भास-भासणी॥
तुकड्यादास म्हणे मी तो दासाचा दास।
नको गा उदास होऊ सद्गुरूराया ! ।।