गोंगाट ले मन काही न पावे उपाय

गोंगाटले मन काही न पावे उपाय ।
अगे सद्गुरु माय! सांग काय करावे?॥
मुखी नाम परि मन न राही जागी।
जळाया कुसंगी वेळोवेळी धाव घे ॥
काय करू काय हरू नाठवे काही।
समाधान नाही अहोरात्र चिंतिता॥
क्षणोक्षणी धाव मारी उडे मनाजी।
कैसे करू राजी तुझे पाय माउली!॥
तुकड्यादास म्हणे हेळसांड ना करी।
बालकाते धरी धरी आपुल्या हाती॥