राहो समाधान सुख-दुःखाचे ठायी
राहो समाधान सुख - दुःखाचे ठायी ।
मन लागो पायी तुझ्या सद्गुरुराया ! ॥
भोगाया प्रारब्ध जीव नेघे माघारी ।
सदा राहो वारी तुझ्या नामावळीची ।॥
कर्म संचिताचे सर्व जळो पोवाडे।
तुझे मार्ग - धडे सदा सेवु आनंदे ॥
वृत्ति धावो ऊर्ध्वे तुझे रूप पहाया।
आसक्तिची माया सर्व जळो माते वो ! ॥
तुकड्यादास म्हणे माझी हाव धावणी ।
न ठेवावी उणी, पूर्ण करा सतगुरु ! ॥