राजीव लोचन सखा माझा नारायण
आनंद-लहरी
राजीव-लोचन सखा माझा नारायण ।
करीन अर्पण जीव प्राण तयासी ॥
तो माझा तो माझा आम्ही दास रायाचे ।
जीवभाव त्याचे पायी ठेवू उल्हासे ॥
दीनाचा दयाळू भीक घाली अनाथा।
दावी आतुरता घ्याया आपुल्या पायी ॥
कर कटावरी उभा विटेच्या भाळी ।
सदा घे उमाळी भक्त - भेटीचे साठी ॥
तुकड्यादास म्हणे आम्हा नुरला कोणी ।
एका चक्रपाणी वाचोनिया हाकेसी ॥