कासयाची उणी आम्हा गुरूच्या पायी

कासयाची उणी आम्हा गुरुच्या पायी ।
समाधान नाही ऐसे निशी न देखो ॥
सदा सर्वकाळ घोष त्यांच्या नामाचा ।
दुसरिया वाचा वाची निशी न देखो ॥
धर्म - कर्म सारे एक गुरुची सेवा ।
आणिकांची धावाधावी निशी न देखो ॥
पाही डोळे गुरु मन गुरु -पादुकी ॥
कर्णी हाकाहाकी दुरजी निशी न देखो ॥
तुकड्यादास म्हणे गुरु-मंत्र जो सेवी ।
असोनी अभावी भाव वाढे संगती ॥