तुझ्या नामावीण सुख न पावे जीवा

तुझ्या नामावीण सुख न पावे जीवा ॥
अगा ये केशवा ! नाम गोड ते तुझे ॥
नामचि घोकता वेश्या गणिका तारिली।
नामघेता दिली मुक्ति अजामेळिया॥
नामाच्या प्रतापे स्तंभ फोडोनि आला।
नामाने शांतला हलाहल शिवाचा॥
नामाचा महिमा जाणतिये वाल्मीक।
नामे ध्रुव बालक अढळ पदासी गेला॥
नामे चोखा मेळ, गोरा कुंभार तारी।
काय वर्णू थोरी सख्या! तुझ्या नामाची॥
तुकड्यादास म्हणे नाम-महिमा वेगळा।
तोडी कळिकाळा एका क्षणी घोकता ॥