कसा सावधान काळ मारतो हाका

असा सावधान काळ मारतो हाका ।
सांगा सर्व लोका, काही करा कमाई ॥
दावा दावा काय केले जन्म   पावोनि ? ।
सांगाया जाऊनि किती केली ठेवणी ? ॥
काय तुम्हासवे द्रव्य देती लादोनि ? ।
कोणाचिये मनी ऐसा आला भरवसा ? ॥
काय तुम्हासवे उडी घेती जिवलग ? ।
सोड वाया डाग यम - कुंड - पुरीचा ॥
तुकड्यादास म्हणे नामा सारिखे धन ।
नाही, त्रिभुवन जरी राज्य लाभेल ॥