सुख नाही देही ऐसा सर्वांचा भाव

सुख नाही देही ऐसा सर्वांचा भाव ।
करा जरी ठेव धन्य केली   कमाई ॥
गेलिया गेलिया काय लावशी हाता ।
जन्म फुका जाता नर्क न चुके बापा !॥
गेले कर्म धर्म सर्व तारुण्यामाजी
अंतकाळी मर्जी क्रुद्ध झाली यमाची ॥
नाही संत - संग सज्जनांचा सहवास ।
सदा केला वास विषयी लोका संगती ॥
तुकड्यादास म्हणे नित्य असा सावधान ।
हरिचे भजन कधी न भूला बापा ! ॥