कामाचीये मिसे देव धर्म आठवे
कामाचिये मिसे देव धर्म आठवे ।
ऐसियाच्या सवे काय बोलावे आम्ही ? ॥
सदा अविश्वास, नाही दया अंतरी।
कामासाठी करी हरी हरी कुसमिता ॥
नाही नित्याचार प्रेम भाव ज्या अंगी ॥
वेळोवेळा सांगे आम्ही दास देवाचे ।।
सुखाचीच आस नाही पथ्यापथ्याची।
आपुलिये वाची माझे माझे वाखाणी ॥
तुकड्यादास म्हणे दुःख भोगावे आधी।
मग पावे संधी नाम - प्रेमाची गोडी ॥