आम्हा दुःख झाले जरी कोट्यानुकोटी

आम्हा दुःख झाले जरी कोट्यानुकोटी ।
तरी आम्हासाठी कुणा त्रास न पावो ।।
जरी कष्ट पडे देही आमुच्या  भारी ।
तरी जनांतरी दुःख न हो   माझिये ।
न दुःखो हे मन जरी निंद्यु आमुचा ।
आमुच्या कर्माचा कुणा क्रोध न वाटो ।।
न मिळो ते सुख स्वर्ग मोक्षाची रीति ।
जरी दुःखी होती सत्याचिये अंतरे ।।
तुकड्यादास म्हणे आम्ही सुख हे मानू ।
अणु या परमाणु संतोषवू प्रेमाने ।।