लोका दावाया काय झालासे ज्ञानी

शब्दज्ञान्यास उपदेश
       (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ)
लोका दावावया काय झालासे ज्ञानी ? ।
अनुभवा आणी पुढे पावसी लाभ ॥
नाही तरी गेला जन्म सारा वाउगा ।
घेतलासे फुगा मोती मोल देउनी ॥
केले पाठांतर परी घर ना ठावे ।
लागे नागवावे तया रंग ना लाहे ।।
पंच पक्वान्नाच्या जरी बोलिले गोष्टी ।
तरी काय पुष्टि कोण्या झाली शरीरा ? ।।
तुकड्यादास म्हणे ज्ञान घ्यावे अनुमानी ।
मग व्हावे मानी खळ निंदकांपुढे ।।