वेदांताचे बोलो काय फुके बोलावे
वेदांताचे बोल काय फुके बोलावे ? ।
आपुले स्वभाव कधी पालटू नेदी ॥
नको शब्द - वाद आम्हा प्रेमाची गोडी ।
तयाचिये तोंडी येर ओस शब्द हे ॥
ओंकाराचा जप जरी बोलिला वाचे।
तरी बीज त्याचे जाणतिये जाणती॥
सर्वांचिये ताटी वाढे अम्रुतपान ।
परि प्याल्यावीण तृप्त कोणता झाला ? ॥
तुकड्यादास म्हणे बोल बोलिया गावे।
आधी अनुभवावे मग द्यावे लोकांते ॥