वेदांताचे बोल
वेदांताचे बोल काय फुके बोलावे ? ।
कर्म ओसंडावे तरी न पावे स्वाद्॥
स्वाद तो मिळाला एका प्रेमाच्या ठायी।
ठायी नेम राही तरी फावला लाभ॥
लाभ होता ज्ञान अनुभवे उमाळे ।
उमाळिता बळे सुख पावे ठायीच ॥
ठायी झाले सुख सुखीपणा निमाला।
मूळ वस्तु झाला देह - बुद्धि हरोनि॥
तुकड्यादास म्हणे नोहे बोलके बोल।
कर्मावीण फोल तया कोणी पुसेना ॥