वेदो महावाक्य काय संगाया केले ?

वेदो - महावाक्य काय सांगाया केले ?।
 गुह्य ते राहिले अनुभवाचे पोटी ।
अनुभव धावे एका सद्भावा मागे ।
सद्भाव उमाळे कर्म धर्माच्यालागे ॥
धर्म तो आकळे श्रेष्ट - आज्ञा पाळता ।
आज्ञेची निष्ठता संत - सेवा दाखवी ॥
करा संत-सेवा शास्त्र अनुमानी आणा ।
मग गुह्य जाणा अंतर्भाव वेदाचा ॥
तुकड्यादास म्हणे व्यर्थ तोंडाच्या बोली ।
नाही आकळिली योग - मायामंत्राची ॥