अहो ब्रह्मज्ञान काय मिळे बाजारी ?
अहो ! ब्रह्मज्ञान काय मिळे बाजारी ?।
म्हणूनी वैखरी रंगविली शब्दाने ॥
काय ग्रंथ पाठ केला शास्त्र -अभ्यास ।
पाठोपाठी भास कोणा सत्य झालासे ?॥
जप तपे दाने जरी केली बळाने।
आवराया मन सर्व कुसुमी लागती ?॥
यज्ञ याग नेम व्रते साधिली भारी ।
पोटाचे भिकारी भीक आसक्ति मागे ॥
तुकड्यादास म्हणे विना सद्गुरु - कृपा।
मार्ग नोहे सोपा ब्रह्मज्ञान मिळाया ॥