घरामाजी घर घरे दोन चार

घरामाजी घर घरे दोन चार । तेथे निरंतर वास तुझा ।।
वरी कारभार पाही माया-राणी । जाणतिये ज्ञानी जाणे तुज ॥
तुझिये प्रकाशे प्रकाशले जग । परी भासे ढग मायागुणे ॥
तुझे नाव खरे आहे आत्माराम । परी भासे भ्रम राम्या गोम्या ॥
नव्हे मन बुद्धि चित्त अहंकार । साक्षी निरंतर रूप तुझे ॥
तुकड्यादास म्हणे तुझा तूचि पाही । ओळखोनि घेई गुरु-कृपे ॥