सद्गुरु बोध होता झापडी झुर झाली

(चाल- गुरुनाथ निरंजन हो)
सद्गुरु-बोध होता, झापडी दूर झाली
जागृती स्वप्न-भास, सुषुप्ति दृष्टी आली॥
देहता अहंकारी, यातुनी झोप झाली।
निवृत्ति-व्दारी जाता, शांतता-माय व्याली॥
वैराग्य अंगी बाणे, जागृती प्राप्त होतां।
निरसली कामना ती, सद्गुरु-पायी जाता॥
हरपली भेद-माया, निज दृष्टी निहारीतां ।
संसार-भास गेला, ज्ञानाग्नि-ज्वाल होतां ॥
मी तू हा भेद नुरला, संदेह-श्रांति गेली l
इंद्रिये अहंतेची वाटची नष्ट झाली॥
दृश्यास ठाव नुरला, कमीक दृष्टी मेली।
जाताचि महाद्वारी, ज्योतिची वफा पडली॥
पश्चिम द्वार उघडे, लागले मणीपूर।
सत्रावी जीवनकला, तेथूनि तिचा तार॥
मध्यस्थ रुद्र-स्थान, शोभले जी! सुंदर ।
कंठींचा जीवभासे चैतन्य - तेजदार।।
दृष्टिची वृष्टि झाली, साक्षिता बाणताचि।
मस्तता अंगी आली,निज-निशा जाणताचि ।॥
दृश्यास ठाव नुरला सद्गुरु एकलाचि।
तुकड्याशी तुकड्याची ऐक्यता एकदाची॥