डोळीयाचा डोळा कुणी पाहिला बाई !
डोळियाचा डोळा कुणी पाहिला बाई ! ।
डोळा होउनि राही ऐसा भाव डोळ्याचा ।
डोळियाचे डोळी माये! देखिला टेव ।
पाहता संदेहो मी तू पण निमाले ॥
फाकले आकाश मोतियासी पूर आला ।
जैसा संचरला कोटी भानू - प्रकाश ॥
पाही डोळा देखे डोळा डोळियामाजी ।
डोळियाची हाजी काय बोलू मायवो! ॥
तुकड्यादास म्हणे ऐसा पाहू विरळा ।
लाधलासे डोळा जाता मूळ - घरासी ॥