ढगाचे कपाटी आणि काळोखा पोटी
ढगाचे कपाटी आणि काळोखा पोटी।
नीलबिंदू - तटी हिरा रेखिला दादा ! ॥
श्रृंगार लावण्य कांति तेजो - उमाळी।
भासे जळी स्थळी तेचि रूप गा दादा !॥
नसोनी असला ऐसा न दिसे भासणी।
साक्षियाच्या खुणी ज्ञानी जाणती दादा ! ॥
प्रभा प्रभी दाट जैसी लाट तेजाची।
जिथे पाहण्याची वेळ न फावे दादा ! ॥
तुकड्यादास म्हणे ढग अज्ञाने भासे।
नाही तरी जैसे असे नसे समरसी ॥